प्रॉजेक्ट “उड्डाण”- एक झेप स्वावलंबनाकडे या महीला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत डिजिटल साक्षरता कार्यशाळा घेण्यात आल्या. सदर कार्यक्रम नवी मुंबईतील समाजसेवक श्री व सौ अभिजित देसाई तसेच प्रगती फाउंडेशन कार्यकारी संचालक सौ सिध्दी किरण राणे यांच्या सहकार्याने प्रगती फाउंडेशन जुईनागर येथील प्रशिक्षण केंद्रात राबविण्यात आला. या कार्यशाळेत महिलाना संगणकाचे बेसिक ज्ञान तसेच डिजिटल टेक्नॉलॉजी ओळख करून देण्यात आली. इंटरनेट, ईमेल, ऑनलाइन बँकिंग सेवा, ऑनलाईन पद्धतीने शॉपिंग, सोशियल मिडिया, रेल्वे तिकीट बुकिंग, ऑनलाईन पद्धतीने सरकारी योजना इत्यादी बाबी कार्यशाळेत सहभागी महिलांना शिकविण्यात आले. दहा दिवसांचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या सर्व महिलांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. सदर प्रशिक्षण महिलांना कोणतेही शुल्क न आकारता राबविण्यात आला.