स्वयमसेवी संस्था प्रगती फौंडेशन आणि विमल फौडेशन यांच्या संयुक्त विध्यमाने नवी मुंबईत महाआरोग्य शिबिराचे आयोजन.
नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार आणि माजी पालक मंत्री गणेश नाईक यांची शिबिरात उपस्थिती
नवी मुंबई : जुईनगर गावदेवी समाज मंदीर हॉल येथे प्रगती फौंडेशन आणि विमल फौडेशन यांच्या सयुंक्त विध्यमाने आज शनिवार दिनांक 17 ऑगस्ट 2019 रोजी महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारताच्या स्वातंत्र्याला 73 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराला आय. टी. एम. हेल्थ सायंस, न्यु मिलेनियम होस्पिटल, स्वराशी नेत्रालय, एम. जी. एम. डेंटल, डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल नवी मुंबई आणि अनविश्का ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले.
सदर आरोग्य शिबिरात विविध आरोग्य विषयी सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यामध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी व रक्त चाचण्या तसेच नेत्र चिकित्सा, दंत चिकित्सा , रक्त दाब तपासणी , रक्त गट तपासणी , आर.बी.सी. , सी.बी.सी. , बी. एम. डी. , बी.एम.आय. आणि ई.सी.जी. तपासण्या इत्यादीचा समावेश होता. त्याचप्रमाणे गरजू व ज्येष्ठ नागरीकांना डोळे तपासून मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
प्रगती फाऊंडेशन आणि विमल फौंडेशन या संस्था गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असून संस्थेच्या स्थापनेपासून सामाजिक,आरोग्य,आणि शैक्षणिक क्षेत्रात विविध वंचित समुहांच्या सक्षमिकरणासाठी कार्यक्रम राबवित आहे .तसेच सहयोगी संस्था आय. टी. एम. इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स नवी मुंबई यांनी देखील नर्सिंग, लॅब टेक्नॉलॉजी व ऑपटॉमेट्री विद्यार्थी मार्फत शिबिरात सेवा उपलब्ध करून दिली.तसेच शिबिरात अंधश्रद्धा निर्मुलन विषयावर जनजागृती करण्याकरिता पथनाट्य सादर केले.आरोग्य शिबिरात दोनशेहून अधिक लोकांनी उपस्थिती लावली आणि जवळपास तीस लोकांनी रक्तदान केले.शिबिरात शंभर लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तसेच गरजू लोकांना मोफत औषधे देण्यात आले. पन्नासहुन अधिक लोकांची ई. सी..जी. तपासणी करण्यात आली.विशेष म्हणजे संस्थेमार्फत आजच्या दिवशी पूरग्रस्तांसाठी साताऱ्यातही शिबिराचे आयोजन केले होते.गरजू आणि वंचीतांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा दोन्हीही संस्थानी कायम राखली याबद्दल माजी पालकमंत्री गणेश नाईक तसेच नवी मुम्बईचे महापौर श्री.जयवंत सुतार यांनी कौतुक केले.स्थानिक नगरसेविका तनुजा मढवी यांच्या उपस्थितीत शिबिरातील प्रथम उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
महापौर श्री जयवंत सुतार तसेच गणेश नाईक यांनी शिबिरातील प्रत्येक विभागाला भेट देवून उपलब्ध असलेल्या आरोग्य सेवेचा आढावा घेतला. तसेच शिबिरात आलेल्या नागरिकांशी सवांद साधून शिबिराच्या उपयुक्तते विषयी त्यांची मते जाणुन घेतले.
नवी मुम्बईचे माजी पालक मंत्री गणेश नाईक यांनी शिबिरात उपस्थित असलेल्या नागरिकांना आरोग्य विषयी मागर्गदर्शन केले आणि तरूण वयातच होत असलेल्या ह्रुदयविकाराच्या घटनांविषयी चिंता व्यक्त केली. भाषणाच्या शेवटी आरोग्य शिबिरात ई.सी.जी. तपासणी नागरीकाना मोफत उपलब्ध करून दिल्याने दोन्ही संस्थाचे आभार मानून कौतुक केले आणि भविष्यातही अशाचप्रकारे चांगले कार्य करत राह्ण्याचा शुभेछा दिल्या.
सलग सुट्टीचा काळ असूनही जवळपास दोनशेहून अधिक लोकांनी शिबिराचा लाभ घेतला आणि आपलया आरोग्यविषयीच्या समस्यांचे समाधन करून घेतले. विभागातील महिलावर्ग तसेच ज्येष्ठ नागरीकानी शिबिरात लक्षवेधी उपस्थिति दर्शवली होती.
समाजसेवक श्रीधर मढवी, जयेश मढवी, बाळू झरे, स्वराशी नेत्रालायचे सुधीर मिश्रा, न्यू मिलेनिअम हॉस्पिटलचे संचालक डॉ. वेंकटेश हांचाटे, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे डॉक्टर प्रशांत कदम आणि डॉ. मंगला वांगे, अनविष्का ब्लड बँकचे श्री. हरिष, आय.टी. एम. नर्सिंगच्या प्राचार्या मिनल राणे, शिक्षिका नैना केदारे व सुप्रिया पाटील, आय टी एम चे रजिस्ट्रार आणि प्रगती फौंडेशनचे अध्यक्ष श्री. किरण राणे, प्रगती फौंडेशनचे राकेश वाणी, मुकेश विश्वकर्मा आणि सौ. सिद्धि राणे, विमल फौंडेशनचे आकाश ढसाळ व प्रकाश ढसाळ आदी मान्यवर शिबिरात उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आणि विमल फौंडेशनचे अध्यक्ष श्री. प्रकाश ढसाळ यांनी उपस्थित सर्वांचे आणि सहयोगी संस्थाचे आभार मानले.