प्रगती फौंडेशनच्या वतीने सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप
सातारा: प्रगती फौंडेशन मुंबई (रजि) ही संस्था नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते याची प्रचिती पुन्हा एकदा सातारकरांना अनुभवायला मिळाली.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात खासकरून दूर डोंगर वस्त्यांवर वसलेल्या गावात अनेक सुख सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे तेथील ग्रामस्थांची गैरसोय होत असते. अशाच एका साताऱ्यातील घोडेवाडी (वारुगड) गावातील शाळेतील मुलांची अवस्था आहे. या गावातील राहणाऱ्या लोकांचं जीवन हे शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेतील सुविधांभावी शिक्षणासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. अनेकवेळा घरातील गरीबीमुळे शिक्षण अर्धवट सोडून द्यावे लागते.
गावातील काही होतकरु तरुण पिढी कामानिमित्त मुंबई, पुणे सारख्या शहरात नोकरी करून शाळेला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असतात.
याच प्रयत्नातून गावातील “बळीराजा सामाजिक आणि बहू उद्देशीय संस्था” यांनी प्रगती फौंडेशनला संपर्क केला व गावातील शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्यासाठी विनंती केली.
आज दिनांक 13 जुलै2019 रोजी प्रगती फौंडेशनच्या वतीने घोडेवाडी गावातील शेतकऱ्यांच्या पहिली ते सातवी इयत्ता मधील विध्यार्थ्याना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. प्रत्येक विध्यार्थ्याला एक स्कुल बॅग, दहा वह्या, एक छत्री, एक कंपास पेटी, एक नॅपकिन, एक टॉवेल, वॉटर बॉटल आणि टिफिन बॉक्स असा संच देण्यात आला. गावातील शेतकरी आधीच कर्जबाजारी त्यातून त्याला मुलांसाठी शालेय खर्च परवडत नाही हीच बाब लक्षात घेऊन आज संस्थेच्या वतीने जवळपास शंभर विध्यार्थ्याना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी प्रगती फौंडेशनच्या शालेय शिक्षण विभाग प्रमुख सौ. सिद्धी किरण राणे, सभासद प्रणय ढमाळ, सागर ढमाळ, संस्थेचे प्रशासक श्री. राकेश मधुकर वाणी आणि बळीराजा सामाजिक व बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. संस्थेला विशेष सहकार्य हरिहर पुत्र समाज भजन मंडळ मार्फत मिळाले.
प्रगती फौंडेशनच्या वतीने भविष्यातही शेतकऱ्यांसाठी आणि आदिवासी भागातील विध्यार्थ्याना अशीच मदत केली जाईल याची ग्वाही सौ. सिद्धी राणे यांनी दिली.