15 ऑगस्ट स्वातंत्र्य् दिनाचे औचित्य साधून नवी मुबंईत आरोग्य तपासणी शिबीर

प्रगती फाऊंडेशन आणि विमल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विध्यमाने दिनांक 15 ऑगस्ट 2018 रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आय. टी.एम. हेल्थ सायंस पुरस्कृत, गावदेवी समाज मंदिर हॉल, जुईपाडा गाव जुईंनगर नवी मुंबई येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीरात न्यु मिलेनीयम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिट्ल , अनविष्का ब्ल्ड बँक आणि स्वराशी नेत्रालय यांच्या मार्फत तज्ञ डॉक्टरांची सेवा उपल्ब्ध करण्यात आली होती. शिबीरात जवळपास 400 शिबीरार्थीनी उपस्थिती लावली. शिबीरामध्ये विषेश उपस्थिती महिला, व ज्येष्ठ नागरीकांची उल्लेखनिय होती. तज्ञ डॉक्टरांमार्फत उपस्थित शिबीरार्थीची मोफत आरोग्य तपासाणी करण्यात आली.

मोफत आरोग्य तपासाणी शिबीराचे उद्घाट्न स्थानिक आमदार मा. श्री. संजीव गणेश नाईक यांच्या मार्फत करण्यात आले. विविध प्र्कारच्या रक्त तपासण्या ब्लड शुगर तपासणी, RBC, CBC,BMD, BMI, ECG आणि नस संवेदना चाचणी इ. सुविधा आवश्यक निवडक रुग्णांना मोफत उपलब्ध करण्यात आल्या होत्या. तसेच एक्स रे , 2 डी इको आणि सोनोग्राफी ( X-Ray, 2D Echo and Sonography) चाचण्या ख़ास सवलतीच्या दरात उपलब्ध करण्यात आल्या होत्या. मोफत शारिरीक आरोग्य तपासणी , रक्तगट तपासणी, नेत्र तपासणी, चश्मे वाटप , आणि दंत चिकीत्सा इ सुविधाही शिबीरार्थीना उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. हृदयरोग तज्ञ अस्थिरोग तज्ञ आणि एंडोक्राइनोलॉजिस्ट आदी शिबीरात सेवा बजावित होते.

शिबीरात खासकरुन अपचन , पोटच्या तक्रारी, डायबेटीज आणि सकस आहार याविषयीही तज्ञ डॉक्टरांमार्फत मार्गदर्शन करण्यात येत होते. न्यु मिलेनियम हॉस्पिटल आणि स्वराशी हॉस्पिट्ल मधील तज्ञ  डॉक्टरांमार्फत आरोग्यविषयी विशेष टिप्स देण्यात येत होत्या. निरोगी आरोग्य जगण्यासाठी सतत आरोग्य तपासणी, व फॅमिली डॉक्टरशी सल्ला मसलत आवश्यक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

नव्या मुंबईतील नागरीकांना निरोगी आणि सशक्त जीवन जगता यावे म्ह्णून  अशा प्रकारचे आरोग्य शिबीर सात्यताने आयोजित करण्यात येतील असे आयोजकांमार्फत आश्वासित करण्यात आले. शिबीरात सर्व सहकारी आणि सह प्रायोजक संस्थेमार्फत आरोग्य अधिकारी आणि तज्ञ डॉक्टरांचा सह्भाग विशेष उल्लेखनिय होता. स्थानिक नागरीकांचे आरोग्य राहणीमान उंचविण्याच्या उद्देशाने सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

स्वराशी नेत्रालय आणि आय. टी. एम. ओप्टोमेट्रि यांच्या सहयोगाने शिबीरात मोफत नेत्र तपासणी सेवा उपलब्ध करण्यात आली होती. तज्ञ नेत्र चिकित्स्क आणि डॉक्टर यांच्यामार्फत 270 रुग्णांची तपासणी करुन जवळपास 42 रुग्णाँना नेत्र शस्त्रक्रियेसाठी शिफारस करण्यात आली. आयोजकांमार्फत शिबीरार्थीनां मोफत चष्माचे वाट्प करण्यात आले तसेच जवळपास 50 जणांचे मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्याची सोय उपलब्ध करण्यात येणार आहे.

अंनविष्का ब्ल्ड बँकेच्या सहकार्याने संस्थे मार्फत रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते. विविध रक्तदातांनी उत्सफुर्तपणे या  स्फुरणीय सत्कार्यासाठि सह्भाग नोंदविला होता. यामध्ये प्रामुख्याने कर्मचारी , विध्यार्थी , स्वयंसेवक , इंस्टीट्युट आणि त्यांचे पथक , तसेच स्थानिक नागरीक यांचा सहभाग होता. 72 व्या स्वातंत्र्यदिनी रक्तदानाच्या सत्कार्याने भारतीय जवानांना श्रधांजली वाहण्याची अनोखी कौतुकास्पद प्रथा संस्थेमार्फत सुरु करण्यात आली. सदर रक्तदानाचा कार्यक्रम संपूर्ण दिवसभर उत्सफुर्तपणे सुरु होता. रक्तदानापुर्वी प्रत्येक रक्तदात्याची रक्तदाब, हीमोग्लोबीन, वजन इत्यादि तपासणी करुन घेण्यात येत होती. यश्स्वीपणे रक्तदान करणार्या रक्तदात्याला अंनविष्का ब्ल्ड बँकेच्या वतीने डोनेशन कार्ड आणि प्रमाणपत्र देण्यात येत होते. आयोजकांमार्फत रक्तदात्यांचा उत्साह वाढ्विण्याकरीता विशेष भेट वस्तु देण्यात येत होते. रक्तदानाविषयी बोलताना अध्यक्ष श्री किरण राणे म्हणाले की, “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे प्रत्येक नागरिकांनी यात सहभागी व्हायला पाहिजे. प्रत्येकजण समाजासाठी देणं लागत असत त्यामुळे रक्तदानाच्या रुपाने आपण समाजाला चांग्ल्या प्रकारे परत फेड करु शकतो. आजच्या या रक्तदान शिबीरात तरूणांनी दाखविलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादाने मी भारावून गेलो आहे. अशाप्रकारे सकारात्मक प्रतिसाद असल्यास भविष्यातही अनेक रक्तदानाचे कार्यक्रम लावू अशी ग्वाही देतो .”

मोफत आरोग्य तपासाणी शिबीराचे उद्घाट्न स्थानिक आमदार मा. श्री. संजीव गणेश नाईक यांच्या मार्फत करण्यात आले. प्रगती फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. किरण राणे , विमल फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. प्रकाश ढसाळ यांनी ऊपस्थित तज्ञ डॉक्टर सहकारी स्पॉन्सर्स संस्था , सहयोगी संस्था तसेच इतर मान्यवर यांचे आभार मानून शिबीराचे यश्वसीपणे सांगता केली.